लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतं....
Posted by Unknown
लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं
समाजाचं अध:पतन उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही महाराज
सुभेदारांची सुनही आता सुरक्षित नाही महाराज
आया,बहिनी,लेका,सुना पवित्र राहिली नाही नाती
शासन करणाऱ्या तलवारींची गंजुन गेलीत पाती
आपल्या अब्रुचं लक्तरं,अब्रु झाकण्यासाठीच मागावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतंयं...
हिंदवी स्वराज्य स्थापन करुन,तुम्ही निघुन गेलात महाराज
राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग पटवुन,तुम्ही निघुन गेलात महाराज
पण या पेटलेल्या राष्ट्रप्रेमावर स्वत:ची पोळी भाजणाऱ्या
आणि आमचीच मतं घेवुन शेवटी सत्तेने माजणाऱ्या
गल्ली बोळातल्या पुढाऱ्याला "जाणता राजा" म्हणावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
इंग्रज इथे दिडशे वर्षे राज्य करुन निघुन गेले
भारतीयांचं काय पाणी,ते भारतात राहुन बघुन गेले
भारतीय संस्कृतीच्या छाताडावर आता पाश्चिमात्य संस्कृती नाचतेय
महाराष्ट्रीयन तुतारीच्या नावाखाली इथं इंग्रजांचीच पिपाणी वाजतेय
माय मराठी मरतेय महाराज आणि इंग्रजीला पालखीत बघावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं जगणं झालयं मस्त
नी पोटासाठी राबणाऱ्यांचं इथं मरणं झालयं स्वस्त
किड्या-मुंगीसारखी इथं जगताहेत माणसं
वेदना असह्य होतात म्हणुन इच्छा मरण मागावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा इथे झाला नाही
पुन्हा कुठल्या जिजाऊ पोटी शिवबा जन्माला आला नाही
घरातल्या जिजाऊ आता करिअर वुमन होत आहेत
स्वत: संस्कार करण्याऐवजी मुलाला पाळणाघरात देत आहेत
कुत्र आईकडं अन् पोरगं दाईकडं असललं बघावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
आता एक करा महाराज,यापुढे प्रेरणा कुणाला देऊ नका
अन् कृपा करुन तुम्ही आमच्या स्वप्नातदेखील येऊ नका
काय सांगु महाराज,आता इथल्या तरुणाई बद्दल बोलवत नाही
नी तुमच्या आदर्शांचं ओझं इथल्या तरुण खांद्यांना पेलवत नाही
कर्तव्य विसरुन आमची तरुणाई आपल्याच मस्तीत मग्न आहे
देव घरातली मुर्ती तुमची मना-मनात भग्न आहे
देव घरातली मुर्ती तुमची मना-मनात भग्न आहे
तुमच्या जयंतीला महाराज वर्षातुन दोन वेळा नाचावं लागतयं
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
नी लाज वाटते महाराज या जगात जगावं लागतयं...
©गुरुराज गर्दे

This comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDeleteकाय करणार कॉमेंट करून? शेवटी काढूनच टाकणार ना?
ReplyDeleteप्रा.गुरुराज गर्दे यांची कविता चोरून काय मिळणार आहे, मर्दा ?
Dhanyawad Mitranno...
ReplyDelete"Raje Kaveeta Poster" rocks Back...........
800 prints are already sold out on last Shivajayanti Utsav 19th February 2012,
More 200 New Prints are available for Sale ...... Book your Copies today.....
" लाज वाटते राजे .... या जगात जगावे लागते..."
या इन्टरनेट वरील माझ्या कवितेच्या अभूतपूर्व लोकप्रियतेनंतर....
आता माझी याच कवितेची ही नवी प्रत सदर माहिती बरोबर आपल्याला नव्या पोस्टर कैलेंडर च्या रुपात पाठवत आहे.
सध्या माझ्या "लाज वाटते राजे ... या जगात जगावं लागतं " या कवितेला सर्वदूर मिळत असलेल्या प्रतिसादाने मी खरंच खूप भरवून गेलोय...
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ...!
मला छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शंभूराजे यांच्याबद्दल अपार आदर आहे. मला जर कधी त्यांच्या संदर्भात काही काम करता आले.. तर मी मराठी माणूस म्हणून स्वतः ला फार भाग्यवान समजेन.
ही कविता प्रत्येक शिवभक्तापर्यन्त, प्रत्येक सर्वसामान्य मराठी माणसापर्यन्त पोहोचावी - त्याच्या घरांतील भिंतींवर लागावी (आत्मपरिक्षणासाठी ) अशी माझी अतीव इच्छा आहे.
* शक्य झाल्यास आपण ही कविता आपल्या सर्व मित्र परिवारापर्यंत, सर्व शिवभक्तांपर्यन्त पोहोचवावी ही नम्र विनंती.*
आपण माझी कविता आपल्या मित्रांना ई मेल द्वारे पाठवू / फॉरवर्ड करू शकता. (कृपया प्रिंट काढून मात्र वाटू नये.) कायदेशीर कारवाई होऊ शकते.तसेच माझा कवी म्हणून उल्लेख करण्यास विसरु नये.
कृपया, माझे नाव या कवितेपासून कधीही अलग केले जाऊ नये, ही एक कवी म्हणून माझी विनंती आहे. आपण माझी एवढी विनंती मान्य कराल अशी अपेक्षा.
आपल्याला जर ही कविता आवडली असल्यास... तसेच कुणालाही भेट म्हणुन देण्यासाठी....
किंवा आपल्या परिसरामध्ये विक्री करण्यासाठी सुद्धा या कवितेचे कैलेंडर मागवून घेऊ शकता...
या कवितेचे पोस्टर कैलेंडर अत्यल्प किंमतीत विक्री साठी उपलब्ध आहे...
एका प्रतीचे स्वागतमूल्य आहे ... फक्त २५/- रुपये...
२५ प्रतींपेक्षा अधिकची मागणी असल्यास २२/- रुपये प्रत...
कुरिअर चार्जेस अतिरिक्त :-
महाराष्ट्रात :- रु ५०/- भारतात :- रु १००/-
अधिक माहितीसाठी Aarya Ads & Communications चे श्री. देवीदास अय्यर यांच्याशी ९४२२३०१३०५ वर संपर्क साधावा.
कृपया चेक किंवा डी. डी. "Aarya Ads and Communications" च्या नावे payable at Pune पाठवावा.
आपण अधिक कैलेंडर्स ची मागणीही नोंदवू शकता.
आपल्याशी मैत्रीचा योग आल्याचा मला मराठी माणूस म्हणून खूप आनंद आहे.
पुण्यामध्ये मी करण्यालायक आपले काही काम असल्यास मला अवश्य फोन करीत जा .
* या कवितेचे सर्व प्रकाशन हक्क प्रकाशकाला विकलेले असल्याने या कवितेचे पुनर्मुद्रण, फ्लेक्स, प्रिंट, सादरीकरण, जाहीर वाचन या संदर्भात त्यांची परवानगी घेणे कौपी राईट अक्ट नुसार आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी Aarya Ads & Communications चे श्री. देवीदास अय्यर यांच्याशी ९४२२३०१३०५ वर संपर्क साधावा.
धन्यवाद.
कृपया, कधीही कोणत्याही कवीचे नाव आणि नंबर कट करून कोणतीही कविता किंवा गझल स्वतःच्या नावावर फॉरवर्ड करून खपवू नये...
ReplyDeleteकवितेखाली कवीचे नाव आणि त्याचा संपर्क क्रमांक जरूर द्यावा त्यामुळे वाचक थेट संबंधित कवी, लेखकाला संपर्क करून आपल्या प्रतिक्रिया देवू शकतो...
जर कवी, गझलकार, लेखक आपणांस माहित नसल्यास, तसे स्पष्टपणे नमूद करावे आणि ही कविता माझी नाही असे तरी खाली ठेवावे.. म्हणजे वाचकांचा काही गैरसमज होणार नाही.
ज्या त्या कलाकृतीचा प्रतिसाद, कौतुक आणि श्रेय त्या त्या संबंधित कवी व लेखकाला मिळायलाच पाहिजे, असे मला वाटते, म्हणून हा वाड़मय शुचित्वाचा प्रयत्न... कविता आवडल्यास नेहमीच मूळ कवीचे कौतुक करा... प्रतिक्रिया पाठवा... सर्वांनी प्रामाणिक रहा नी सहकार्य करा...
धन्यवाद.
प्रा. गुरूराज ग. गर्दे.
शैक्षणिक सल्लागार - समुपदेशक, व्याख्याता.
पत्ता :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924
What's Up :- 9422058288
Email :- gururajgarde@gmail.com
Facebook Link :- www.facebook.com/EduStudentCounselor
पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा, महाविद्यालये, संस्थाचालक यांनी LIC of India, Star Health insurance, करीयर मार्गदर्शन, व्याख्याने, विद्यार्थी व पालक समुपदेशन, कार्यशाळा, शैक्षणिक व्यवसाय, माहिती - उपक्रमांसाठी संपर्क साधा.