शाळेचे दिवस खुप सुंदर होते...
Posted by Unknown
शाळेचे दिवस खुप सुंदर होते
मला मात्र तुझ्याशिवाय काहीच सुचत नव्हते
जेव्हा तु शाळेत यायचीस तुझ्याअगोदरच शाळेत असायचो
तु आल्यावर तुझ्याकडे बघतच राहायचो
मनात असुनही तुझ्याशी काहीच नाही बोलायचो
काय करणार तुझ्या बापाला जे घाबरायचो
लहानपणी प्रेम म्हणजे काय हे माहित नव्हते
पण तु फार आवडायचीस हे नक्की होते
असे म्हणतात कि पोरगी हसते अन् फसते
पण मला विश्वास नव्हता कि खरचं असे काही असते
हळु हळु मी ही मोठा होत होतो अन् तु ही मोठी होत होती
आपल्या दोघांमधली नाती वेगवेगळी वळण घेत होती
प्रत्येक रात्र तुझ्याच आठवणीत जात होती
वेड्या मनाला समजावण्याची माझीही परिस्थिती नव्हती
"शाळा" पिक्चर सारखे सोडुन जाशील असे नाही वाटायचे
तुझ्या नसण्याने शंकांचे काहुर मनात दाटायचे
दहावीनंतर तु ठरवले दुसरीकडे अॅडमिशन घ्यायचे
अन् घडले ही तसेच जे होते घडायचे
भरपुर वर्षे झाली तरी आपण मोकळेपणाने नाही बोललो
दो जिस्म एक जान असुनही वेगळ्या वाटेने चालत राहिलो
तुझ्यावर एवढे भरभरुन प्रेम करुनही
तुझ्यासाठी मात्र मी परकाच राहिलो
इथुन पुढे काय होईल हे नाही येत सांगता
हे आयुष्यही संपुन जाईल तुला प्रपोज करता करता
आमच्यावर प्रेम नाही तर कशाला एवढे हसता
आजही आमचं काळीज धडधडत जेव्हा तुम्ही बघता
एक दिवस असाही येणार कि तुम्ही आमच्यावर भरभरुन प्रेम करणार
हे पाहायला आम्ही मात्र या स्वार्थी जगात नसणार
आमची ही प्रेमकथा इतिहासात अजरामर होणार
एवढे अतोनात प्रेम आम्ही तुमच्यावर करुन जाणार...
©अमोल पवळे

कविता वाचल्यावर पुन्हा शाळेतील पहिल्या प्रेमाची आठवण झाली......
ReplyDeleteAmol seriously I became a huge fan of you after reading this post...
ReplyDeleteI love you.....
khup sundar kavita aahe
ReplyDeleteआपण खुप छान कविता करता.आपल्या अजुन कविता ऐकायला आम्हा वाचकांना आवडेल.
ReplyDeleteहि कविता कोणावर केली आहे?
ReplyDeleteI miss my school days...
ReplyDeletereally great poem...
Beautiful... Nice... Superb
ReplyDelete