Thursday, December 20, 2012

मलापण ओळख बनायचं...

Posted by Unknown

जन्माला सगळेच येतात
काहीजण आठवण बनतात
वेगळं काहीतरी करायचं
इतरांपेक्षा वेगळं जगायचं
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं

शाळेत तर सगळेच शिकतात
थोडेच शिकल्यासारखे वागतात
शाळेत फक्त पहिलं यायचं नसतं
शिकतोय का ते समजायचं असतं
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं

घरातल्यांबरोबर सगळेच राहतात
एकत्र तर प्राणी देखील जगतात
फक्त सोबत राहायचं नसतं
घराचं नाव मोठं करायचं असतं
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं

प्रेम तर सगळेच करतात
ऐकमेकांना जीवही लावतात
प्रेम काय कुणाचंही जमतंय
पण वेगळं प्रेमंच अमर होतंय
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं

नोकरी खुपजण करतात
इतरांसारखे तेही कमवतात
मला फक्त कमवायचं नाही
इतरांपेक्षा वेगळं करायचंय काही
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं

चांगल्या कविता खुपजण करतात
त्यातले काहीजण लक्षात राहतात
मला शब्दासोबत वेगळं काही करायचंय
तुम्हाला काही वेळ स्वप्नात जगवायचंय
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं...


1 comments:

स्वत:तला मित्र

Posted by Unknown

 
गुरु ठाकूर 
हे मराठी फिल्म इंडस्ट्रीमधलं गाजलेलं नाव...
त्यांनी सांगितलेली मैत्रीची व्याख्या आणि त्यावरची हि सुंदर कविता.
स्वतःच  स्वत:चा मित्र होणे हीच आजची गरज आहे.
स्वतः स्वताची परीक्षा तिसऱ्या चष्म्यातून करायची.
मित्र म्हणजे मीच त्रयस्तपणे...


कि नेहमीच नसतं अचूक कुणी, घड्याळ देखील चुकतं राव,
जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातचा डाव.
पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे,
अश्या वेळी मोडू नये धीर कधी सोडू नये,
नशिबाच्या नावानेही उगीच बोटं मोडू नये.
भरवश्याचे  करतात दावे, आठवू नये त्यांची नावे,
सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे.
मग अचूक दिसते वाट, बुडण्या आधीच मिळतो काठ,
खडक होऊन हसत हसत झेलता येते प्रत्येक लाट,
ज्याला हे जमलं त्याला सामील होतात ग्रह तारे,
केवळ तुमच्या शिडासाठी वाट सोडून वाहतील वारे,
म्हणून म्हणतो इतक तरी फक्त एकदा जमवून बघा,
आप्त, सखा, जिवलग यार, स्वतःत शोधून पहा.
 
- गुरु ठाकूर

0 comments:

Monday, December 17, 2012

उत्कट-बित्कट

Posted by Unknown

संदीप खरे

उत्कट-बित्कट होऊ नये,भांडू नये, तंडू नये...
असे वाटते आज-काल,नवे काही मांडू नये...

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये सर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये…
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये...
-संदीप खरे

0 comments:

Monday, November 5, 2012

Life of Engineering Student

Posted by Unknown



SYLLABUS जरा जास्तचं आहे
दरवर्षी वाट‌तो...
CHAPTERS पाहुन PASSINGचा
PROBLEM मनात दाट‌तो...

तरी LECTURES सुरु राहतात
डोक्यात काही घुसत नाही...
चित्र विचित्र FIGURES शिवाय
BOARD वर काही दिसत नाही...

तितक्यात कुठुनतरी FUNCTIONची
DATE जवळ येते...
SEM. मधले काही दिवस
नकळत चोरुन नेते

नंतर EXTRA LECTURES घेऊन
भराभरा शिकवत राहतात...
फक्त THEORY सांगुन
SYLLABUS लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालु लागतात
मन मात्र लागत नाही...
सरांशिवाय वर्गामध्ये
दुसरं कुणीच बोलत नाही...

LECTURES संपुन SUBMISSIONचा
सुरु होतो पुन्हा खेळ...
SHEETS COMPLETE करण्यात
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर SYLLABUS
चुटकीसरशी संपुन जातो...
P.L. मध्ये वाचुन सुद्धा
 PAPER का बरं SO SOच जातो...

0 comments:

Sunday, November 4, 2012

मुली मुली मुली मुली.....

Posted by Unknown

मुली मुली मुली मुली.....

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्‍या त्या मुली.
"मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून असलेल्या त्या मुली.
जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इर्षा खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्याहळण्यासाठीच पडलिये अश्या संभ्रमात वावरणर्‍या मुली.
मुली म्हणजे नटण - मुली म्हणजे मुरडनं.
मुली म्हणजे कारण नसताना उगाचच हसनं.

(त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक कोट्या बौधहिक विनोद त्याना झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी कळत नाही हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows, मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी....


अनोळखी

2 comments:

Saturday, November 3, 2012

प्रेम म्हणजे काय ???

Posted by Unknown

प्रेम म्हणजे काय हे कधी कुणाला कळलेच नाही

छोटे से कोड ते, पण कधी कुणाला उलगडलच नाही...




का जीव होतो वेडा पिसा जेव्हा येते तिची आठवण
हृदयात केलेली असते तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची साठवण...




मनाला तिच्या शिवाय काही दुसरे सुचत नाही

पण तिच्याशिवाय दुसरा कुठला विचार करावा असेही कधी वाटत नाही...




रात्री छानच असतात ... तिच्या स्वप्नानी भरलेल्या

देऊन जातात उभारी ... मनातल्या त्या प्रेमाच्या अंकुराला...




प्रेम कधी सफल होते तर कधी नाही... ते जीवनात कधी ही सब कूछ नसतं

पण तरीही हृदयाच्या कुठल्या तरी कोपर्‍यात ते नेहमीच जपायाच असतं...




प्रेमाचे हे कोडं कदाचित कधीच कुणाला उलगडणार नाही ...

पण त्यासाठी हे जग प्रेम करायचे ही कधी थांबणार नाही...


©अनोळखी

2 comments:

Friday, November 2, 2012

प्रिय अतिरेक्क्यांनो...

Posted by Unknown


प्रिय अतिरेक्क्यांनो...

मारून मारून मारलं किती ?
हा १२५ कोटि चा देश आहे
तावुन-सुलाखून निघालो आम्ही
एकात्मता अजूनही शेष आहे

जिंक्ल्याची नशा चढेल ,
हा क्षण चा भास् आहे
१५० वर्षाचा लड़ण्याचा
पाठीशी आमच्या इतिहास आहे

लपून-छापून लढता तुम्ही
औलाद तर भित्र्यांची आहे
दिसली जी झलक आम्हाला
ती पागल कुत्र्याची आहे

कधी हिरवा,कधी भगवा
ही तुमची धार्मिक ढाल असते
वाहिले जाते जे रक्त सरे
ते तर फ़क्त लाल असते

तसे तुमचे नापाक इरादे ही
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत
तिरंग्याची शपत आहे ,
आम्ही उगाचच बकत नाहीत

नाक उचलून बोलतो आम्ही
तुमच्या प्रमाने छक्के नाहीत
राहिल जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटे नाहीत

आमच्या अभंगतेच्या कथा
तुम्हास कळुन चुकल्या आहेत
झाडल्या गोळ्या ,फोडले बोंम्ब
त्या आमच्यासाठी टिकल्या आहेत

हा गैरसमज काढुन टाका
तुम्ही आम्हाला गुलाम कराल!
तुम्हीच `भारत माता की जय म्हणत
तिरंग्याला सलाम कराल !!
जय हिन्द…….. जय महाराष्ट्र……




©अनोळखी

1 comments:

Thursday, November 1, 2012

एक तरी मैत्रीण असावी

Posted by Unknown

एक तरी मैत्रीण असावी

चारचौघीत उठून दिसावी

बोलली नाही तरी निदान

समोर बघून गोड हसावी !



एक तरी मैत्रीण असावी

कधीतरी सोबत फिरावी

दोघांना एकत्र पाहून

गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !



एक तरी मैत्रीण असावी

जिच्याशी निर्मळ संवाद असावा

कधीतरी छोट्या भांडणाचा

एखादाच अपवाद असावा..



एक तरी मैत्रीण असावी

आयुष्याच्या अनोळखी वळणावर

तुमच्या व्यथा वेदनांवर

तिने घालावी हळूच फुंकर..



एक तरी मैत्रीण असावी

जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा

तुमचासुद्धा खांदा कधी

तिच्या दुःखाने भिजावा..



एक तरी मैत्रीण असावी

चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात

मित्रांचे दिवे मावळले म्हणजे

चालावं पुढे तिच्याच प्रकाशात




©अनोळखी


1 comments:

लाज वाट‌ते महाराज या जगात जगावं लागतं....

Posted by Unknown

लाज वाट‌ते महाराज या जगात जगावं लागतयं
समाजाचं अध:पतन उघड्या डोळ्यांनी पाहावं लागतयं
नी लाज वाट‌ते महाराज या जगात जगावं लागतयं...

कायदा सुव्यवस्थेला कुणी भीत नाही महाराज
सुभेदारांची सुनही आता सुरक्षित नाही महाराज
आया,बहिनी,लेका,सुना पवित्र राहिली नाही नाती
शासन करणाऱ्या तलवारींची गंजुन गेलीत पाती
आपल्या अब्रुचं लक्तरं,अब्रु झाकण्यासाठीच मागावं लागतयं
नी लाज वाट‌ते महाराज या जगात जगावं लागतंयं...

हिंदवी स्वराज्य स्थापन करुन,तुम्ही निघुन गेलात महाराज
राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग पटवुन,तुम्ही निघुन गेलात महाराज
पण या पेटलेल्या राष्ट्रप्रेमावर स्वत:ची पोळी भाजणाऱ्या
आणि आमचीच मतं घेवुन शेवटी सत्तेने माजणाऱ्या
गल्ली बोळातल्या पुढाऱ्याला "जाणता राजा" म्हणावं लागतयं
नी लाज वाट‌ते महाराज या जगात जगावं लागतयं...

इंग्रज इथे दिडशे वर्षे राज्य करुन निघुन गेले
भारतीयांचं काय पाणी,ते भारतात राहुन बघुन गेले
भारतीय संस्कृतीच्या छाताडावर आता पाश्चिमात्य संस्कृती नाचतेय
महाराष्ट्रीयन तुतारीच्या नावाखाली इथं इंग्रजांचीच पिपाणी वाजतेय
माय मराठी मरतेय महाराज आणि इंग्रजीला पालखीत बघावं लागतयं
नी लाज वाट‌ते महाराज या जगात जगावं लागतयं...


ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं जगणं झालयं मस्त
नी पोटासाठी राबणाऱ्यांचं इथं मरणं झालयं स्वस्त
किड्या-मुंगीसारखी इथं जगताहेत माणसं
वेदना असह्य होतात म्हणुन इच्छा मरण मागावं लागतयं
नी लाज वाट‌ते महाराज या जगात जगावं लागतयं...

तुमच्यासारखा छत्रपती पुन्हा इथे झाला नाही
पुन्हा कुठल्या जिजाऊ पोटी शिवबा जन्माला आला नाही
घरातल्या जिजाऊ आता करिअर वुमन होत आहेत
स्वत: संस्कार करण्याऐवजी मुलाला पाळणाघरात देत आहेत
कुत्र आईकडं अन् पोरगं दाईकडं असललं बघावं लागतयं
नी लाज वाट‌ते महाराज या जगात जगावं लागतयं...

आता एक करा महाराज,यापुढे प्रेरणा कुणाला देऊ नका
अन् कृपा करुन तुम्ही आमच्या स्वप्नातदेखील येऊ नका
काय सांगु महाराज,आता इथल्या तरुणाई बद्दल बोलवत नाही
नी तुमच्या आदर्शांचं ओझं इथल्या तरुण खांद्यांना पेलवत नाही
कर्तव्य विसरुन आमची तरुणाई आपल्याच मस्तीत मग्न आहे
देव घरातली मुर्ती तुमची मना-मनात भग्न आहे
तुमच्या जयंतीला महाराज वर्षातुन दोन वेळा नाचावं लागतयं
नी लाज वाट‌ते महाराज या जगात जगावं लागतयं... 

©गुरुराज गर्दे

5 comments:

Wednesday, October 31, 2012

शाळेचे दिवस खुप सुंदर होते...

Posted by Unknown

शाळेचे दिवस खुप सुंदर होते
मला मात्र तुझ्याशिवाय काहीच सुचत नव्हते

जेव्हा तु शाळेत यायचीस तुझ्या‌अगोदरच शाळेत असायचो
तु आल्यावर तुझ्याकडे बघतच राहायचो
मनात असुनही तुझ्याशी काहीच नाही बोलायचो
काय करणार तुझ्या बापाला जे घाबरायचो

लहानपणी प्रेम म्हणजे काय हे माहित नव्हते
पण तु फार आवडायचीस हे नक्की होते
असे म्हणतात कि पोरगी हसते अन् फसते
पण मला विश्वास नव्हता कि खरचं असे काही असते

हळु हळु मी ही मोठा होत होतो अन् तु ही मोठी होत होती
आपल्या दोघांमधली नाती वेगवेगळी वळण घेत होती
प्रत्येक रात्र तुझ्याच आठवणीत जात होती
वेड्या मनाला समजावण्याची माझीही परिस्थिती नव्हती


"शाळा" पिक्चर सारखे सोडुन जाशील असे नाही वाटायचे
तुझ्या नसण्याने शंकांचे काहुर मनात दाटायचे
दहावीनंतर तु ठरवले दुसरीकडे अॅडमिशन घ्यायचे
अन् घडले ही तसेच जे होते घडायचे

भरपुर वर्षे झाली तरी आपण मोकळेपणाने नाही बोल‌लो
दो जिस्म एक जान असुनही वेगळ्या वाटेने चालत राहिलो
तुझ्यावर एवढे भरभरुन प्रेम करुनही
तुझ्यासाठी मात्र मी परकाच राहिलो

इथुन पुढे काय होईल हे नाही येत सांगता
हे आयुष्यही संपुन जाईल तुला प्रपोज करता करता
आमच्यावर प्रेम नाही तर कशाला एवढे हसता
आजही आमचं काळीज ध‌ड‌ध‌डत जेव्हा तुम्ही बघता

एक दिवस असाही येणार कि तुम्ही आमच्यावर भरभरुन प्रेम करणार
हे पाहायला आम्ही मात्र या स्वार्थी जगात नसणार
आमची ही प्रेमकथा इतिहासात अजरामर होणार
एवढे अतोनात प्रेम आम्ही तुमच्यावर करुन जाणार...


©अमोल पवळे

7 comments:

कॉलेजचे दिवस...

Posted by Unknown



तु कॉलेजमध्ये पहिल्यांदा दिसलीस
माझ्याकडे पाहुन गालातल्या गालात हसलीस

दर‌रोज फक्त तुझ्यासाठीच कॉलेजला यायचो
मात्र तु भेटल्यावर काय बोलायचे तेच विसरायचो

चार दिवसानंतर तु अचानक गायबच झालीस
मनामध्ये मात्र आठवणी ठेवुन गेलीस

रोज कॉलेजमध्ये येउन तुझी वाट पाहत होतो
तु दिस‌शील या आशेवर रोज एक दिवस काढत होतो

त्या दिवशी कॉलेजमध्ये अचानक समोर आली
काळजाचे पाणी होऊन पापणी ओली झाली

माझ्याकडे पाहताना किती सुंदर लाजते
पाहुनही माझ्याकडे न पाहिल्यासारखे करते

अजुनसुद्धा मी तुझ्यावर खुप प्रेम करत आहे
तु फक्त माझीच होशील या आशेवर जगत आहे


©अनोळखी

0 comments:

तुमच्या नसण्यानं राजे आज खुप काही हरवलयं...

Posted by Unknown

स्वार्थापायी माणसांनी माणुसकीपण हरवलयं
स्रीचं चारित्र्य तिचं तिनचं विकायला काढलयं
निष्ठेला विकुन लोकांनी लबाडीनं मन भरलयं
तुमच्या नसण्यानं राजे आज खुप काही हरवलयं...

पैशाच्या जोरावर श्रीमंतांनी गरिबांना वाळवलयं
जन्मणाऱ्या बाळाला सुद्धा यांनी लाच द्यायला शिकवलयं
अंत:करणातील देव विसरुन त्याला मंदिरात बसवलयं
तुमच्या नसण्यानं राजे आज खुप काही हरवलयं...

स्वत:च्या नीचपणाचा कळस गाठुन नियतीला लाजवलयं
महाराज तुमच्या स्वराज्यात यांनी हे काय चालवलयं
घात केलाय स्वत:च्या धर्माचा अन् देवानांही पिटाळ‌लयं
तुमच्या नसण्यानं राजे आज खुप काही हरवलयं...

हिंदुंच्याच देशात हिंदुंना कुत्र्यासारखं नाचवलयं
जनतेला त्यांच्या स्वकीयांनीच घुमवलयं
या सगळ्या साठमारीत सामान्यांचं जीवन भरडलयं
तुमच्या नसण्यानं राजे आज खुप काही हरवलयं...

राजकारणी डुकरांनी आख्ख रानं माजवलयं
ईमानाला विकुन भ्रष्टाचाराला गाजवलयं
मतांच्या राजकारणात स्वाभिमानालाच संपवलयं
तुमच्या नसण्यानं राजे आज खुप काही हरवलयं...




©अनोळखी

2 comments:

अभिमान आहे मला भारतीय असल्याचा ...

Posted by Unknown

अभिमान आहे मला भारतीय असल्याचा ...
जिथे भ्रष्ट नेत्यांचे घोटाळे उघड होऊन सुद्धा ते निवडून येतात
अतिरेक्याला अटक केल्यावरही इथे आंदोलने होतात

Merit List मध्ये येऊन सुद्धा जिथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही
मेहनती तरुणांना वशिला नाही म्हणून नोकरी मिळत नाही

सरकारी अनुदान मान्य होते पण ती शेतक-यांपर्यंत पोहचत नसतात
म्हणून शेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी आत्महत्येचा सोपा मार्ग निवडतात


जिथे सरकारी नोक-या फक्त तिथे काम करणा-यांच्या नातेवाईकांना मिळतात
आणि या सगळ्यात सामान्य माणसाचे हात रिकामेच राहतात

जिथे एखादा भ्रष्ट नेता Jail मधून बाहेर आल्यावर जल्लोष साजरा केला जातो
जिथे आपला देश कसा संपत चाललाय असे म्हणत आपण चहा पितो

जिथे मतदानाच्या दिवशी नागरिक Hill Station वर फिरायला जातात
आणि तिथे जाऊन बोगस मतदानावर चर्चा करत बसतात

प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी अभिमानाने मिरवलेले झेंडे
दुस-या दिवशी कचरापेटीत आणि रस्त्यावर पडलेले असतात ....
देशासाठी बलिदान दिलेले सुद्धा आजच्या पिढीला माहित नसतात...

जिथे आज हि राष्ट्रगीत कोणी लिहिले हेसुद्धा अनेकांना माहित नाही अशा या देशाचा खरचं अभिमान आहे मला ???

जागे व्हा आणि हा देश बदला आणि मगच म्हणा
"मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे".......


©अनोळखी

1 comments:

महालक्ष्मी प्रिंटींग प्रेस,पिरंगुट.

Posted by Unknown

All Types of Offset & Screen Printing

The Complete Biz Solution
  • Wedding Cards

  • Visiting Cards

  • Bill Books

  • Envelopes

  • Letter Pad

  • Brouchers

  • Invoices

  • Challan

  • Xerox

  • Colour Xerox

  • A3 Colour Xerox

  • Colour Printing

  • Lamination

  • Rubber Stamps

  • Customized Designs

 

Contact :

9890303220/8275465220

mahalaxmi-enterprises@in.com 

 

Address :

Near Heena Bakery,

Ghotawade Phata,Pirangut.

0 comments:

Sitemap

Posted by Unknown

<?xml version="1.0" encoding="UTF-8"?>
<urlset xsi:schemaLocation="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9 http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9/sitemap.xsd" xmlns:xsi="http://www.w3.org/2001/XMLSchema-instance" xmlns="http://www.sitemaps.org/schemas/sitemap/0.9">
<!-- created with Free Online Sitemap Generator www.xml-sitemaps.com -->
<url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>1.00</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/11/blog-post_384.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/11/blog-post_3215.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/11/blog-post_7118.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/11/blog-post_1.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/10/blog-post_7350.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/10/blog-post_31.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/10/blog-post.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/10/abhimaan.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/11/blog-post.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012/11/privacy-policy.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012_11_01_archive.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/2012_10_01_archive.html</loc><lastmod>2012-11-05T08:30:50+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/comments/default</loc><lastmod>2012-11-03T19:39:29+00:00</lastmod><priority>0.80</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/2000324478827413296/comments/default</loc><lastmod>2012-11-03T19:39:29+00:00</lastmod><priority>0.64</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/2361604073013431489/comments/default</loc><lastmod>2012-11-03T19:39:29+00:00</lastmod><priority>0.64</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/6600802734805344515/comments/default</loc><lastmod>2012-11-01T17:03:38+00:00</lastmod><priority>0.64</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/4692084921879880139/comments/default</loc><lastmod>2012-11-03T19:39:29+00:00</lastmod><priority>0.64</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/2878609952743086748/comments/default</loc><lastmod>2012-11-03T19:39:29+00:00</lastmod><priority>0.64</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/3799830171107644291/comments/default</loc><lastmod>2012-10-31T14:00:08+00:00</lastmod><priority>0.64</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/583828977307548432/comments/default</loc><lastmod>2012-11-01T17:04:54+00:00</lastmod><priority>0.64</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/1493123234839740357/comments/default</loc><lastmod>2012-11-01T17:09:50+00:00</lastmod><priority>0.64</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/7210572245677563420/comments/default</loc><lastmod>2012-11-01T04:40:45+00:00</lastmod><priority>0.64</priority></url><url><loc>http://amolmarathikavita.blogspot.com/feeds/4160624322249914630/comments/default</loc><lastmod>2012-11-02T06:18:20+00:00</lastmod><priority>0.64</priority></url></urlset>

0 comments:

Tuesday, October 30, 2012

Privacy Policy

Posted by Unknown

Privacy Policy for amolmarathikavita.blogspot.com

If you require any more information or have any questions about our privacy policy, please feel free to contact us by email at pawale.amol77@gmail.com.

At amolmarathikavita.blogspot.com, the privacy of our visitors is of extreme importance to us. This privacy policy document outlines the types of personal information is received and collected by amolmarathikavita.blogspot.com and how it is used.

Log Files
Like many other Web sites, amolmarathikavita.blogspot.com makes use of log files. The information inside the log files includes internet protocol ( IP ) addresses, type of browser, Internet Service Provider ( ISP ), date/time stamp, referring/exit pages, and number of clicks to analyze trends, administer the site, track user’s movement around the site, and gather demographic information. IP addresses, and other such information are not linked to any information that is personally identifiable.

Cookies and Web Beacons
amolmarathikavita.blogspot.com does not use cookies.

DoubleClick DART Cookie
.:: Google, as a third party vendor, uses cookies to serve ads on amolmarathikavita.blogspot.com.
.:: Google's use of the DART cookie enables it to serve ads to users based on their visit to amolmarathikavita.blogspot.com and other sites on the Internet.
.:: Users may opt out of the use of the DART cookie by visiting the Google ad and content network privacy policy at the following URL - http://www.google.com/privacy_ads.html

Some of our advertising partners may use cookies and web beacons on our site. Our advertising partners include ....
Google Adsense


These third-party ad servers or ad networks use technology to the advertisements and links that appear on amolmarathikavita.blogspot.com send directly to your browsers. They automatically receive your IP address when this occurs. Other technologies ( such as cookies, JavaScript, or Web Beacons ) may also be used by the third-party ad networks to measure the effectiveness of their advertisements and / or to personalize the advertising content that you see.

amolmarathikavita.blogspot.com has no access to or control over these cookies that are used by third-party advertisers.

You should consult the respective privacy policies of these third-party ad servers for more detailed information on their practices as well as for instructions about how to opt-out of certain practices. amolmarathikavita.blogspot.com's privacy policy does not apply to, and we cannot control the activities of, such other advertisers or web sites.

If you wish to disable cookies, you may do so through your individual browser options. More detailed information about cookie management with specific web browsers can be found at the browsers' respective websites.

0 comments: