मलापण ओळख बनायचं...
Posted by Unknown
जन्माला सगळेच येतात
काहीजण आठवण बनतात
वेगळं काहीतरी करायचं
इतरांपेक्षा वेगळं जगायचं
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं
शाळेत तर सगळेच शिकतात
थोडेच शिकल्यासारखे वागतात
शाळेत फक्त पहिलं यायचं नसतं
शिकतोय का ते समजायचं असतं
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं
घरातल्यांबरोबर सगळेच राहतात
एकत्र तर प्राणी देखील जगतात
फक्त सोबत राहायचं नसतं
घराचं नाव मोठं करायचं असतं
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं
प्रेम तर सगळेच करतात
ऐकमेकांना जीवही लावतात
प्रेम काय कुणाचंही जमतंय
पण वेगळं प्रेमंच अमर होतंय
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं
नोकरी खुपजण करतात
इतरांसारखे तेही कमवतात
मला फक्त कमवायचं नाही
इतरांपेक्षा वेगळं करायचंय काही
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं
चांगल्या कविता खुपजण करतात
त्यातले काहीजण लक्षात राहतात
मला शब्दासोबत वेगळं काही करायचंय
तुम्हाला काही वेळ स्वप्नात जगवायचंय
तुम्हाला काही वेळ स्वप्नात जगवायचंय
काहीतरी वेगळं करायचं
मलापण ओळख बनायचं...

